patur nagar palika.jpg 
विदर्भ

कौतुकास्पद...‘पाच रुपये टाका आणि मास्क घ्या’...काय असेल बरे हे, वाचा...

श्रीकृष्ण शेगोकार

पातूर (जि. अकोला) : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना संक्रमण होऊ नये, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरात घरोघरी जाऊन नगरपरिषदेच्या कोरोना टीमने घरातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक मास्क वाटप केले. परंतु, प्रत्येक वेळी घरोघरी जाऊन मास्क वाटप करणे शक्य नसल्याने मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या आदेशावरून कोरोना समन्वय अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेत सर्वसामान्यांना फक्त पाच रुपयात मास्क मिळण्यासाठी ॲटोमॅटीक वेन्डीग मशीन लावून एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे.

उपक्रमाला जनता करत आहे सहकार्य
पाच रुपये टाकले की, मशीनमधून मास्क प्राप्त होईल. यामुळे सामान्य जनतेचा खर्चही वाचेल व नगरपरिषदेचे कामही कमी होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बाहेरगावावरून आलेल्यांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषदने हा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाला जनतेने सहकार्य करावे प्रशासनाने, शासनाने वेळोवेळी नमुद केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी यावेळी केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षिका श्रीमती कल्याणी सोळंके, कोरोना समन्वय अधिकारी सज्जाद विराणी, नामदेव भोंडे, देवेंद्र ढोणे, स.अशपाक, श्रीकृष्ण पाटील यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

Satara News: साताऱ्यात मृतदेहांची अदलाबदल;एकाच स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार,हलगर्जीप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित!

Chhatrapati Sambhajinagar: ‘मार्च एंड’ला रात्री बिलांचा पाऊस; कोषागार कार्यालयात कधी नव्हे एवढी लगबग; कोट्यवधी रुपये केले अदा

SCROLL FOR NEXT